Saturday, October 9, 2010

" माझ्या कठीण वेळी "

माझ्या कठीण वेळी
माझे न कोणी राहिले
ज्यांना मी माझे  म्हटले
ते सारे फितूर जाहले...
दु:ख उगाळण्याचा
स्वभाव
माझा  नाही जरी
तुझ्याशी बोलतांना
मोकळी मी होते खरी...
विसरून सारे पुढे चालण्याचा
कित्ता तुझा मी गिरविते 
जगा आणि जगू द्या
हेच  मनावर बिंबवते...
दुखितांचे अश्रू पुसण्याचा
धर्म माझा मी मानते 

आनंदाची पखरण करण्यात
जीवनाची धन्यता मानते...

No comments: