Monday, November 15, 2010

"वाचनप्रिया"

जेव्हा कधी ती,मागे वळून बघते
तेव्हा,तेव्हा एक अबोल मुलगी
तिच्या डोळ्यासमोर येते
ओठांनी ओठ घट्ट मिटून बसणारी
आणि संधी मिळताच वाचत राहणारी
कधी सभोवतालची पुस्तकं तर कधी सभोवतालची माणसं
वाचता वाचता ती "वाचनप्रिया"
प्रकट होऊ लागली,सहजसुंदर शब्दात,शब्दांच्याच कृपेने...
आता ते शब्दांचे धन ,गाठी बांधून समाधानाने,
सुरु झालाय प्रवास त्या वाचनप्रियेचा
एकेक मैलाचे दगड पार करत
शब्दांच्या वाटेवर...
साहित्य समृद्धीच्या शोधात...
असाच प्रत्येकाला प्रत्येकाचा
आनंदाचा ठेवा मिळो
ह्या शुभेच्छा देत देत ...ह्या शुभेच्छा देत देत ...ह्याच  शुभेच्छा...
-ज्योती कपिले

No comments: