का होतात माझ्या देशात
दंगे,जाळपोळ,बॉम्बस्फोट,हल्ले
का माझ्या देशातले माणूसपण मेले?
का समजून घेत नाही,आणि का समजून देतही नाही मी
तत्व माणुसकीची...माणसांना?
का फक्त जाणतो मी, भाषा दांडगाईची?
का त्याने गाय मारली म्हणून,वासरू मारू लागलो मी?
का जगण्यासाठी माझ्या,जगण्यावर तुझ्या नांगर फिरवत गेलो मी?
का पाहू शकलो नाही मी,माझ्याच मुलांच्या डोळ्यातील
उज्ज्वल भविष्यांची कोवळी स्वप्नं?
का उमलण्याआधीच त्यांना निर्दयपणे तुडवत गेलो मी?
का आणि कशाच्या हव्यासापायी मलाच विसरत गेलो मी?
भुगा झालाय पार मेंदूचा माझ्या,प्रश्नांच उठलंय मोहळ
उत्तर शोधतांना मात्र मलाच सापडत गेलोय मी
मग,दोन घटका तरी ते 'कां'चं वादळ शमाव .. म्हणून मलाच शहीद केलं मी
आता तरी तुला शांततेत जगता यावं ...अशी आशा करतो मी...
ज्योती कपिले.
No comments:
Post a Comment