का होतात माझ्या देशात
दंगे,जाळपोळ,बॉम्बस्फोट,हल्ले
का माझ्या देशातले माणूसपण मेले?
का समजून घेत नाही,आणि का समजून देतही नाही मी
तत्व माणुसकीची...माणसांना?
का फक्त जाणतो मी, भाषा दांडगाईची?
का त्याने गाय मारली म्हणून,वासरू मारू लागलो मी?
का जगण्यासाठी माझ्या,जगण्यावर तुझ्या नांगर फिरवत गेलो मी?
का पाहू शकलो नाही मी,माझ्याच मुलांच्या डोळ्यातील
उज्ज्वल भविष्यांची कोवळी स्वप्नं?
का उमलण्याआधीच त्यांना निर्दयपणे तुडवत गेलो मी?
का आणि कशाच्या हव्यासापायी मलाच विसरत गेलो मी?
भुगा झालाय पार मेंदूचा माझ्या,प्रश्नांच उठलंय मोहळ
उत्तर शोधतांना मात्र मलाच सापडत गेलोय मी
मग,दोन घटका तरी ते 'कां'चं वादळ शमाव .. म्हणून मलाच शहीद केलं मी
आता तरी तुला शांततेत जगता यावं ...अशी आशा करतो मी...
ज्योती कपिले.
Tuesday, December 28, 2010
Monday, November 15, 2010
"वाचनप्रिया"
जेव्हा कधी ती,मागे वळून बघते
तेव्हा,तेव्हा एक अबोल मुलगी
तिच्या डोळ्यासमोर येते
ओठांनी ओठ घट्ट मिटून बसणारी
आणि संधी मिळताच वाचत राहणारी
कधी सभोवतालची पुस्तकं तर कधी सभोवतालची माणसं
वाचता वाचता ती "वाचनप्रिया"
प्रकट होऊ लागली,सहजसुंदर शब्दात,शब्दांच्याच कृपेने...
आता ते शब्दांचे धन ,गाठी बांधून समाधानाने,
सुरु झालाय प्रवास त्या वाचनप्रियेचा
एकेक मैलाचे दगड पार करत
शब्दांच्या वाटेवर...
साहित्य समृद्धीच्या शोधात...
असाच प्रत्येकाला प्रत्येकाचा
आनंदाचा ठेवा मिळो
ह्या शुभेच्छा देत देत ...ह्या शुभेच्छा देत देत ...ह्याच शुभेच्छा...
-ज्योती कपिले
तेव्हा,तेव्हा एक अबोल मुलगी
तिच्या डोळ्यासमोर येते
ओठांनी ओठ घट्ट मिटून बसणारी
आणि संधी मिळताच वाचत राहणारी
कधी सभोवतालची पुस्तकं तर कधी सभोवतालची माणसं
वाचता वाचता ती "वाचनप्रिया"
प्रकट होऊ लागली,सहजसुंदर शब्दात,शब्दांच्याच कृपेने...
आता ते शब्दांचे धन ,गाठी बांधून समाधानाने,
सुरु झालाय प्रवास त्या वाचनप्रियेचा
एकेक मैलाचे दगड पार करत
शब्दांच्या वाटेवर...
साहित्य समृद्धीच्या शोधात...
असाच प्रत्येकाला प्रत्येकाचा
आनंदाचा ठेवा मिळो
ह्या शुभेच्छा देत देत ...ह्या शुभेच्छा देत देत ...ह्याच शुभेच्छा...
-ज्योती कपिले
Saturday, October 9, 2010
" माझ्या कठीण वेळी "
माझ्या कठीण वेळी
माझे न कोणी राहिले
ज्यांना मी माझे म्हटले
ते सारे फितूर जाहले...
दु:ख उगाळण्याचा
स्वभाव माझा नाही जरी
तुझ्याशी बोलतांना
मोकळी मी होते खरी...
विसरून सारे पुढे चालण्याचा
कित्ता तुझा मी गिरविते
जगा आणि जगू द्या
हेच मनावर बिंबवते...
दुखितांचे अश्रू पुसण्याचा
धर्म माझा मी मानते
आनंदाची पखरण करण्यात
जीवनाची धन्यता मानते...
माझे न कोणी राहिले
ज्यांना मी माझे म्हटले
ते सारे फितूर जाहले...
दु:ख उगाळण्याचा
स्वभाव माझा नाही जरी
तुझ्याशी बोलतांना
मोकळी मी होते खरी...
विसरून सारे पुढे चालण्याचा
कित्ता तुझा मी गिरविते
जगा आणि जगू द्या
हेच मनावर बिंबवते...
दुखितांचे अश्रू पुसण्याचा
धर्म माझा मी मानते
आनंदाची पखरण करण्यात
जीवनाची धन्यता मानते...
Subscribe to:
Posts (Atom)